महिला व मुलींनी माता जिजाऊ, रमाई, अहिल्यादेवी यांचे विचार आत्मसात करा!

0

चाळीसगाव । महिला व मुलींनी टिव्हीतील मालिकांना चिटकून न राहता माता जिजाऊ, रमाई, अहिल्याबाई आदी महामाताचे विचार आत्मसात करावे, असे प्रतिपादन व्याख्याते प्रमोद राजपूत यांनी केले. राष्ट्रीय महाविद्यालयात माता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित व्याख्याने प्रसंगी ते बोलत होते. जिजाऊ जयंतीनिमित्त सकाळी 9 वाजता शहरील शासकीय विश्रामगृहातून महिला व मुलींची भव्य सायकल व मोटारसायलक रॅली शहरातून काढण्यात आली.

आई जगाचे दुःख स्वतःच्या काळजात गोंदते – उत्तम कांबळे
‘प्रत्येक वळणावर आपल्या मुलाला यशाचे शिखर गाठण्यासाठी आई अनेक बाबींशी झुंज देत असते यामुळे तिला अनेक अगणित रूपे धारण करावी लागतात. आई आपल्या लेकरचे आवाज ऐकून आतले आणि बाहेरचे दुःख पाचावते व ते स्वतःच्या काळजात गोंधते’, असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक तथा विचारवंत उत्तम कांबळे यांनी केले. येथील उमंग परिवारातर्फे स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त आजपासून सुरु झालेल्या व्याख्यानमालेचे पुष्प गुंफतांना ते बोलत होते. ‘आई समजून घेतांना’ हा त्यांचा व्याख्यानाचा विषय होता. आमदार उन्मेश पाटील, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, पंचायत समितीच्या सभापती स्मिताल बोरसे, यांच्या सह विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी व्यास पिठावर उस्थित होते. श्री. कांबळे यांनी आपल्या लहानपणाच्या आठवणी सांगून श्रोत्यांच्या डोळ्यात पाणी आणले. जीवन जगतांना भूक व दारिची लढाई खूप मोठी आहे. आणि ती समजली केवळ आईमुळे. आईने मला हाडाची कांड करून, काबाड कष्ट करून कसे जीवन काढले. जन्मापासून ते आजपर्यंत आईने काय कष्ट केले या विषयावर श्री. कांबळे यांनी प्रकाश टाकला. लेकराला वाचविण्यासाठी आई देवाशी कशी लढा देते उदाहरण डोळ्यासमोर उभे करत त्यांचा आईने त्यांचा जन्मापासून कशा यातना भोगल्या याचे वर्णन उस्थितांसमोर मांडले. आई हे जगातील सर्व श्रेष्ठ दैवत असून आजच्या काळात आई नावाची गोष्ट सर्वच बाजूने अडचणीत आली आहे. स्त्रीभ्रूण हत्येसारखे अनेक समाज विघातक कृत्ये बंद करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले.

भुईमुगाच्या शेतात जन्म झाल्यापासून ते थेट साहित्यिक, विचारवंत व संपादक पदापर्यंतचा जिवंत प्रवास उत्तम कांबळे श्रोत्यांसमोर मांडला. बौद्धिक विकासाबरोबरच मनाचा विकास करण्यासाठी व्याख्यानांचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगून सोशल मिडिया ‘ऑनलाईन’ होत असतांना वाचण्या बरोबरच चांगले विचार ऐकणेही गरजेचे असल्याचे आमदार उन्मेश पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले.

शहरातून रॅली
माता जिजाऊ यांचा जन्मोत्सव चाळीसगाव येथे विविध कार्यकामांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रॅलीत महिला व मुलींना भगवे फेटे घालून सायकल व मोटारसायलक रॅली घेऊन दाखल झाल्या. ’जय जिजाऊ, जय शिवराय, तुमचे आमचे नाते काय, जय जिजाऊ जय शिवराय‘ या घोषणांनी रॅलीला सुरूवात करण्यात आली. सिग्नल पॉईंट, भडगाव रोड, खरजई रोड, हॉटेल दयानंद, सदानंद मार्ग, घाट रोड, रांजणगाव दरवाजा, सराफ बाजार मार्गे, तहसील कार्यालय, स्टेशन रोड वरून पुन्हा सिग्नला पॉईंट जवळून रॅलीचा समारोप हिरापूर रोडवरील राष्ट्रीय महाविद्यालयात करण्यात आला. चाळीसगाव शहरात प्रथमच जिजाऊच्या लेकी एवढ्या मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे संपुर्ण वातावरण भगवेमय झाले होते. तब्बल दोन तास शहरातून रॅली काढण्यात आली होती. रॅलीचा समारोप झाल्यानंतर राष्ट्रीय महाविद्यालयात प्रमोद राजपूत यांच्या व्याख्यानाला सुरूवात करण्यात आली. यावेळी व्यासपिठावर पारोळ्याचे वक्ते प्रमोद राजपूत, प्राचार्य एस.आर.जाधव, पत्रकार प्रफुल्ल साळुंखे, मिनाक्षी निकम, सोनल साळुंखे, कावेरी पाटील, नगरसेविका सविता राजपूत, अ‍ॅड.आशा शिरसाठ, भारती चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक आयोजक सोनल साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, खुशाल पाटील, प्रा. सुनिल निकम, डॉ. रवि चव्हाण, गोरख साळुंखे, शैलेद्र सातपूत, रमेश पोतदार, शांताराम पाटील, स्वप्नील कोतकर, बबन पवार, पंडीत साळुंखे, संदीप साळुंखे, संजय साळुंखे, योगेश साळुंखे, भुषण साळुंखे, भुषण पाटील, जितेंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

पीपल्स सोशल फाऊंडेशन, चाळीसगाव
चाळीसगाव । स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती कॉलेज पॉईंट धुळे रोड येथे साजरी करण्यात आली. यावेळी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन देवेंद्र मोरे व अमोल पवार यांच्याहस्ते करण्यात आले. दिपप्रज्वलन शिवसागर पाटील, सागरभाऊ मोरे व निरज अजबे यांनी केले. विकास पोळ यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास आकाश पोळ, शिवसागर पाटील, सागर मोरे, मंगेश साळवे, शुभम पवार, यज्ञेश बाविस्कर, सौरभ त्रिभुवन, प्रणव वाघ, सागर अहिरे, प्रणाल पवार, पारस सांगिले, स्वप्नील ढहाळे, निरज अजबे, केतन पाटील, भूषण सावंत, पवन महाजन, सागर अहिरे, श्रीकांत वाघ, हर्षल जोशी, समाधान अहिरे, प्रसाद साळुंखे, दिनेश कुंभारे, ऋषिकेश देशमुख, अमोल पाटील, विशाल मुलमुले, अतुल पाटील, भूषण राजपूत, निलेश वाघ, भाऊसाहेब चौधरी, अजय झाल्टे, अनिकेत पोळ, शुभम महाजन, मयुर पाटील, निखिल मोराणकर, धनंजय वाघ, किरण गायकवाड आदी उपस्तिथ होते. सूत्रसंचालन प्रणव वाघ व आभार आकाश पोळ यांनी मानले.

पीपल्स सोशल फाऊंडेशन
नगरदेवळा । येथील एस.के.पवार विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. सकाळी 9 वाजता संस्थेचे मानद चिटणीस शिवनारायण जाधव यांनी राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना शिवनारायण जाधव यांनी प्रत्येक विद्यार्थिनीने आपल्यात राजमाता जिजाऊ व विद्यार्थ्याने स्वामी विवेकानंद यांचे विचार व कार्याचे अवलोकन केले. तर खर्‍या अर्थाने भारत सक्षम होईल असे सांगितले. यावेळी प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रोशन जाधव यांनी केले.

जय बजरंग व्यायामशाळा येथील जय बजरंग व्यायाम शाळेच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन अग्नावंती नदीपात्रात करण्यात आले होते. नगरदेवळा बाळद गटाचे जि.प.सदस्य रावसाहेब पाटील यांनी प्रतिमेचे पूजन केले. यावेळी अखिल भारतीय कुणबि परिषदेचे अध्यक्ष आत्माराम पाटील, दलपत पाटील, अविनाश कूडे, भैया महाजन, सागर पाटील, कृष्णा सोनार, प्रकाश परदेशी, निपाणे सरपंच राजेंद्र पाटील, निलेश पाटील, रविंद्र महाजन, कडू पाटील, भूषण पाटील, मनोज पाटील, भैया पाटील यांसह जय बजरंग व्यायाम शाळेचे कार्यकर्ते व गावातील नागरीक उपस्थित होते.

गरुड महाविद्यालय, शेंदुर्णी
शेंदुर्णी । येथील गरुड महाविद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. या दोन्ही महापुरुषांच्या जीवन कार्यावर वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून प्रकाश टाकला.
प्रा ए.एन.जिवरग व प्रा. प्रमोद सोनावणे यांनी आपल्या व्याख्यानातून प्रेरणादायी विचार मांडले प्रा. जिवरग सरांनी सांगितले की स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातून त्याग व निर्धार शिकावे, जिजाऊ मा साहेबानी शिवबा घडवताना कशाप्रकारे त्याग केला व जिजाऊ ह्या संस्कारांचे विद्यापीठ होते. असे प्रा. सोनावणे सरांनी सांगितले. प्राचार्य डॉ.वासुदेव पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, महापुरुषासांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आपले जीवन कसे घडावे, हा विचार विद्यार्थ्यांनी करावा. याप्रसंगी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे वाचन विद्यार्थ्यांकडून करून घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ.आर.डी.गवारे यांनी मानले. याप्रसंगी उपप्राचार्य एन.एस.सावळे उपप्राचार्य आर.जी.पाटील व महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

संस्कार इंग्लिश मिडीयम स्कुल, सामनेर
नांद्रा । येथील कस्तुराई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित संस्कार इंग्लिश मिडीयम प्री प्रायमरी स्कुलमध्ये राष्ट्रमाता जिजामाता जयंती व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. संस्था चालक महेंद्र साळुंखे यांनी प्रतिमा पुजन केले तर वैशाली साळुंखे, अनुराधा पाटील यांनी राष्ट्रमाता जिजामाता व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनपट विषयी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.

जिल्हा परिषद शाळा, बिलवाडी
जळगाव । तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा बिलवाडी येथे 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक सुखदेव पाटील हे होते. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन हा युवक दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त शाळेतील उपशिक्षक संदिप पाटील यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांविषयी व जीवन चरित्रविषयी मार्गदर्शन केले, तसेच जीवनात नेहमी सकारात्मक विचार करुन आपली ध्येयप्राप्ती करावी या स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर चर्चा केली. राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना कशाप्रकारे शिकवण दिली या विषयी देखील मार्गदर्शन केले.

सूत्रसंचलन संदिप पाटील यांनी तर आभार तारावंती नन्नवरे यांनी मानले. यावेळी सागर पाटील, योगिता पाटील, शमिका जगताप, यामिनी मराठे, नयना पवार, या विद्यार्थ्यांनी देखील मनोगत व्यक्त केले. तालूक्याच्या गटशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी रविकिरण बिर्‍हाडे, म्हसावद केंद्रप्रमुख राजेंद्र सपकाळे यांचे मार्गदर्शन लाभले. पदवीधर शिक्षक महेंद्र पाटील, विनोद नाईक, अर्चना गोसावी उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय, पहुर
पहूर । येथील क्रांतीज्योती सार्वजनिक सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालयातर्फे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जामनेर पं.स. माजी सभापती बाबुराव घोंगडे होते. कार्यक्रमप्रसंगी ग्रंथालयाचे उपाध्यक्ष गावंडे, अध्यक्ष विवेक जाधव, अ‍ॅड.प्रशांत बाविस्कर, संजय कापडे, कसबे विकासो चेअरमन एकनाथ जाधव, विकास जाधव, महात्मा फुले पतसंस्थेचे माजी चेअरमन प्रकाश लहासे, सुधाकर घोंगडे आदिंची प्रमुख उपस्थिती होती. गावंडे सरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वितेकरीता सुषमा जाधव, शारदा भोंडे, हरिश्‍चंद्र जाधव, सुरेश जाधव, आकाश जाधव, वैशाली सपकाळ, कल्पना चौधरी यांनी परिश्रम घेतले. प्रास्तविक व आभारप्रदर्शन विवेक जाधव यांनी केले.

रयत सेनेतर्फे येथे राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात
चाळीसगाव । राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची जयंतीनिमित्त 12 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता येथील पवारवाडी स्थित विठ्ठल रुख्मिणी मंदीरात रयत सेनेच्या वतीने साजरी करण्यात आली. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन जिजाई महिला मंडळाच्या सचिव माया सावंत व रयत शिक्षक महिला सेनेच्या शहर अध्यक्षा जयश्री माळी यांच्याहस्ते करण्यात आले यावेळी गणेश पवार यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जिवनावर प्रकाश टाकला त्यांनी शिवाजी महाराजाना स्वराज्य स्थापन करण्याचे प्रेरणा देऊन रयतेचे राज्य निर्माण केले असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, जिल्हा अध्यक्ष संजय कापसे.तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, अनिल पाटील, विलास मराठे, खुशाल मराठे, विलास पाटील, सोमनाथ माळी, सतीश पवार, पवन पवार, मंगेश पवार, सुनिल निबाळकर, आकाश धुमाळ, मंगेश देठे यांच्यासह सुशीला देशमुख, तारामती रावते, वंदना भोसले, सिंधुबाई भामरे, शामबाई माळी, इंदुमती भालेराव, निलाबाई अहिरे आदी तर रयत सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

क्रिएटिव्ह स्कुल, नांद्रा
नांद्रा । येथील क्रिएटिव्ह इंग्लिश स्कुलमध्रे अभिवादन करतांना प्रा.यशवंत पवार सोबत शिक्षिका अरुधंती रांजिन्दे, वैशाली ठाकुर, प्रा.यशवंत पवार, मनिषा सोनार, सपना कुंभार, नम्रता पवार, शुभांगी पाटील आदी.

प्राथमिक विद्या मंदिर बाहेरपूरा,पाचोरा
नांद्रा । पाचोरा रेथील बाहेरपुर्‍रातील प्राथमिक विद्या मंदिरामध्रे मुख्याध्यापक एस. एस.साळूखे यांच्याहस्ते प्रतिमपूजन करण्यात आले. यावेळी एस.यु.पवार, ए.एस.परदेशी, व्ही.बी. पाटील, एस.एन.वाघ, अविनाश पाटील, संदीप मगर, अनिल शेळके, एस.एस. तायडे आदी उपस्थित होते.