महिला शिपाईची आत्महत्येची धमकी

0

पिंपरी : ‘पोलिस ठाण्याचे दोन्ही निरीक्षक मला त्रास देत आहेत. वरिष्ठ असल्यामुळे मला त्यांच्याविरूद्ध काही बोलता येईना. त्यामुळे या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करणार आहे. माझ्या आत्महत्येस हे दोघे जबाबदार असतील, अशा आशयाचा संदेश पोलिस व्हॉटस्अप ग्रुपवर एका महिला कर्मचार्‍याने टाकला. त्यामुळे ठाण्यात एकच चर्चा सुरू आहे. महिला अधिकारी, महिलेच्या अन्य मैत्रिणींनी समजूत काढल्यावर हा प्रश्‍न निकाली निघाला. वरिष्ठांना हा प्रकार कळल्यावर ते घटनेची माहिती घेण्यासाठी पोलिस ठाण्यात आले होते. त्यामुळे वरिष्ठांनी हा विषय गांभिर्याने घेतले असून लवकरच सत्य समजेल.

परिमंडळ 3 मधील एका पोलिस ठाण्यात संबंधित महिला शिपाईची नियुक्ती आहे. दैनंदिन बंदोबस्त ठेवणे, कोणाला कोणती ड्यूटी देण्यात आली याची नोंद ठेवण्याचे काम या महिलेकडे आहे. दैनंदिन कामकाजासाठी व्हॉटस्अप ग्रुप या महिला शिपाईने बनविला आहे. याचा जाब निरिक्षकाने महिलेला विचारला. त्यातूनच कटुता निर्माण झाली. सोमवारी या शिपाई महिलेने ‘आपण आत्महत्या करणार असल्याचे’ मेसेज टाकले. परिस्थितीचे गांभीर्य पहाता महिला अधिकार्‍यांनीच या महिलेची समजूत काढली. दोन्ही निरिक्षक व महिला यांच्याशी बोलून नक्की काय झाले, याची माहिती घेणार असल्याचे वरिष्ठांनी सांगितले.