महिला सक्षमीकरणाबाबत जाणीव जागृती

0

यावल : महिला व बालविकास विभागाअंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षा मार्फत जिल्हा बाल संरक्षण कक्ष जळगाव व अंकुर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने बाल संरक्षण व महिला सक्षमीकरणाबाबत जाणीव जागृती व सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हास्तरावर एकात्मिक बाल संरक्षण योजनेची प्रभावी अंमलबजावणी व विशेष काळजी संरक्षणाची गरज असलेले बालकांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा व त्यांना त्यांचे विचार चित्र व कलेलच्या माध्यमातून निर्भिडपणे मांडण्यासाठी एक व्यासपीठ मिळावे याकरीता त्यात डान्स, चित्रकला, निबंध स्पर्धा, निंबू चमचा, संगीत खुर्ची कार्यक्रमांचा समावेश होता.

40 बालकांसह 30 महिलांनी सहभाग घेतला
या कार्यक्रमास 40 बालकांनी व 30 महिलांनी सहभाग घेतला. प्रस्तावना जिल्हा बाल संरक्षण अधिकारी योगेश एस. मुक्कावार यांनी केली. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश काटकर, सामाजिक कार्यकर्त्या निवेदीता ताठे, जैन स्पोर्ट अकादमीचे समन्वयक फारुक शेख, संरक्षण अधिकारी आरती साळुंखे, अंकुर प्रतिष्ठान अध्यक्ष मनिषा बागुल उपस्थित होते. यशस्वीतेसाठी श्रीकांत निळे, शफिक अहमद खान व अंकुर प्रतिष्ठानच्या कर्मचार्‍यांनी सहकार्य केले. या स्पर्धेत व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी बालकांना व महिलांना बक्षिस व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. योगेश मुक्कावार यांनी आभार मानले.