वासुदेव शर्मा ; भुसावळात नरेंद्र मोदी विचारमंचचा मेळावा
भुसावळ- महिला सक्षमीकरणाशिवाय देशाचा विकास शक्य नाही त्यामुळे देशातील प्रत्येक महिलेने आत्मनिर्भर होणे गरजेचे असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साडेचार वर्षात महिलांच्या सबलीकरणार भर दिला असल्याचे मत नरेंद्र मोदी विचारमंच राष्ट्रीय उपाध्यक्ष वासुदेव शर्मा यांनी येथे व्यक्त केले. पंचायत समिती सभागृहात सोमवारी नरेंद्र मोदी विचारमंच मेळावा झाला. प्रसंगी शर्मा यांनी केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर मंचचे पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष संजय घारगे, चिकीत्सा विभागाचे संतोष राठोड, जिल्हाध्यक्ष नारायण कोळी, निता गाजरे, स्वरूप हंडे, राजश्री नेवे, निर्मला कोळी, काशिनाथ कोळी, महेंद्र चौहान, छाया राणे, सचिन महाले, माया चौधरी आदिंसह नरेंद्र मोदी विचारमंचचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, मेळाव्याप्रसंगी काही महिलांनी आपल्या समस्याही मांडल्या.