नारायणगाव । महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने महिला सबलीकरण आणि बाल हक्कासाठी राबविण्यात येणार्या योजनांची समाजस्तरावर अंमलबजावणी आणि माहिती प्रसारासाठी शासन स्तरावर कृती कार्यक्रम राबविण्यात येईल, असे प्रा.आस्मा शेख यांनी सांगितले. नारायणगाव येथील उर्दू शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शैक्षणिक कार्यकर्ता सभेत प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बाल कल्याण मंत्रालय महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या प्रा.आस्मा शेख उपस्थित होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.
महिला सबलीकरणाच्या शासन योजनेअंतर्गत नारायणगाव येथे मुस्लिम समाजासाठी मोठा प्रकल्प ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला जाईल, असेही आश्वासन यानिमित्ताने प्रा.आस्मा शेख यांनी दिले. याप्रसंगी उर्दू शाळा पालक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष अकबर बेग, माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आरिफ आतार, प्रमुख संयोजक मेहबूब काझी, जिल्हा अल्पसंख्यांक काँग्रेसचे उपाध्यक्ष एजाज चौधरी, खसाल जाफरी, मुख्याध्यापिका सय्यदा बानो, अंगणवाडी कार्यकर्त्या खतिजा शेख, सगिरा शेख, रुबीना पठाण, रेश्मा चौगुले, शाहीन तांबोळी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व पालक याप्रसंगी उपस्थित होते.