अमळनेर। तालुक्यातील गोवर्धन येथे आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रयत्नाने 5 लाख निधीतून निर्माण झालेल्या महिला सार्वजनिक शौचालयाचे थाटात लोकार्पण आ चौधरी यांच्याहस्ते करण्यात आले. या शौचालयामुळे या गावाची वाटचाल हागणदारी मुक्तीकडे होणार आहे. गोवर्धन येथे काही लोकांकडे शौचालयाची सोय नसल्याने अनेक महिलांना रोडलगत उघड्यावर जावे लागत होते, अनेक वर्षांपासून हे वाईट चित्र असतांना कोणीही लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नव्हते अखेर हे चित्र आ चौधरींच्या निदर्शनास आल्याने त्यांनी त्वरित गावासाठी महिला शौचालय मंजूर करून लागलीच काम पूर्णत्वास आणले. यामुळे महिलांची मोठी सोय झाली आहे.
यांची होती उपस्थिती: आ. शिरीष चौधरी यांनी हागणदारी मुक्तीकडे गावाची वाटचाल व्हावी, व गावाच्या आरोग्यासाठी शुद्ध पाण्याचे आरओ प्लान्ट देण्याचे अभिवचन दिले. काळभैरवनाथ देवस्थानसाठी सभामंडप देण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले. प्रा.अशोक पवार, नरेंद्र चौधरी, सुनील भामरे, पंकज चौधरी, सरपंच गजानन शिंदे, उपसरपंच व्ही.डी. पाटील, पिरण नाईक, अनुबाई सोनवणे, अनिल पाटील, नरेंद्र पाटील, शरद साळूखे, मधुकर पाटील, नंदकिशोर चौधरी, सुधीर चौधरी, विनोद चौधरी, योगेश पाटील, चंद्रशेखर साळुंखे, दिलीप साळूखे, निबा साळूखे, बापू साळुंखे, उत्तम भिल, नाना भिल, बापू चौधरी आदि उपस्थित होते.