महिला सुरक्षिततेसाठी समिती

0

अध्यक्षपदी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला

पुणे । माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारच्या गृह विभागाने समिती स्थापन केली असून, या समितीच्या अध्यक्षपदी पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महिलांवर प्राणघातक हल्ले होत आहेत. त्यामुळे सुरक्षेबाबत उपाययोजनासाठी विधान परिषद, विधानसभेतील महिला सदस्यांसह वरिष्ठ महिला पोलिस अधिकार्‍यांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला, तर सदस्य म्हणून आमदार डॉ. नीलम गोर्‍हे, स्मिता वाघ, तृप्ती सावंत, देवयानी फरांदे, अतिरिक्त महासंचालक प्रज्ञा सरोदे, विशेष पोलिस महानिरीक्षक अर्चना त्यागी आणि विशेष पोलिस महानिरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आयटी क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षेसाठी
ही समिती पुण्यासह अन्य शहरांमध्ये आयटी क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना सुचविणार आहे. एका महिन्यात याबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे.