पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती सुनीता तापकीर यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील मुली, महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षितेतसाठी करायच्या उपाययोजनांबाबत मंगळवारी विशेष बैठक घेण्यात आली. महापालिकेच्या कै. मधुकर पवळे सभागृहात झालेल्या या बैठकीस नगरसेविका योगिता नागरगोजे, निकिता कदम, चंदा लोखंडे, रेखा दर्शिले, नगरसेवक सागर आंगोळकर, सहाय्यक आयुक्त प्रवीण अष्टीकर, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, सहाय्यक समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे, प्रशासन अधिकारी बजरंग आवारी, आय.टी.आय.चे प्राचार्य शशिकांत पाटील, सुरक्षा अधिकारी वाबळे, कार्यालयीन अधीक्षक सोमा आंबवणे उपस्थित होते.
उपाययोजनांबाबत चर्चा
या बैठकीत शहरातील मुली, महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने करायच्या विविध उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेत सर्वांनी आपापली मते मांडली. महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या वतीने लवकरच विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.