महिलेचा खून नव्हे तर पाण्यात बुडून मृत्यू

0

जळगाव । शिरसोली शिवारातील बंधार्याजवळ 4 रोजी सकाळी ममता राजु बारेला वय 30 या महिलेचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला होता. दरम्यान महिलेच्या शवविच्छेदनाच्या अहवालावरून महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याचे एमआयडीसी पोलिसांनी सांगितले. शिरसोली शिवारातील स्टोन क्रशरवर राजू बारेला यांचे कुटुंबिय कामाला असून नेवर्या मारुती नाल्याजवळ दि.4 रोजी सकाळी राजू बारेला यांची पत्नी ममता बारेला यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. महिलेच्या कपाळाजवळ सुज असल्याने पाय घसरून नाल्यात पडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला होता तरी देखील पोलिसांनी मयत महिलेचा पती राजू बारेला व दोन संशयित इसमांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या महिलेचे धुळे येथे शवविच्छेदन होवून वैद्यकीय अहवाल आज सकाळी पोलिसांना प्राप्त झाला. दरम्यान यात महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याचे नमुद करण्यात आले आहे.