पिंपरी-चिंचवड : शेजारी राहणार्या महिलेला विजेच्या धक्क्यापासून वाचविताना एका तरुणावर जीव गमाविण्याची वेळ आली. दुपारी पावणेतीन वाजता दापोडीच्या जयभीम नगरमध्ये घडली. सागर गौतम बोरुडे (वय 30, रा. जयभीम नगर, दापोडी) असे त्याचे नाव आहे.
प्राथमिक माहितीनुसार सागरच्या शेजारी राहणार्या ऋता पंडित ( वय 37) यांना विजेचा धक्का बसला. त्यावेळी सागर त्यांना वाचविण्यासाठी धावत गेला. नंतर वाचविण्याच्या प्रयत्नात त्यालाच विजेचा जोरदार झटका बसला. त्या धक्क्याने तो बेशुद्ध झाला. त्याला त्वरित उपचारासाठी औंधच्या मेंडी पॉइंट हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथून पुढील उपचारासाठी संध्याकाळी पावणेचारच्या सुमारास वायसीएम रुग्णालयात आणले. मात्र, उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे येथील डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र वायसीएमच्या नोंदवहीत या घटनेची नोंद करण्यात आली आहे.