चोपडा । तालुक्यातील वेले येथील शेतकरी मका विक्रीचा हिशोब 80 हजार रुपये पिशवीत घालून घेऊन जात असताना रस्त्यात पिशवी फाटून खाली पडले ते त्यांच्या उशिरा लक्षात आले साठ हजार रुपये सदर शेतकर्याला कोणताही मोबदला न घेता परत केला त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल हरीश श्रीकिसन अग्रवाल व सुनीता सुहास अग्रवाल यांचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे व पोनि किसनराव नजनपाटील यांनी
अभिनंदन केले.
स्त्यात पिशवी फाटल्याने पैसे पडले
24 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास शेतकरी ज्ञानेश्वर रनछोड पाटील (रा.वेले ता.चोपडा) यांनी मका विक्रीचे 80 हजार रोख रक्कम तूट 100 रुपयांच्या नोटांचे 8 बंडल व्यापारी सुनील मोहनलाल अग्रवाल यांचे बालाजी मंदिराच्या पाठीमागील घरातून सदर पैसे प्लास्टिक पिशवीत टाकून गोल मंदिराच्या पुढे जाऊन बाबू वाणी यांचे दुकानावर उधारी जमा करण्यासाठी जात असताना रस्त्यात सदर पैसे गोल मंदिर ते तहसील कार्यालया दरम्यानच्या रस्त्यात पिशवी फाटल्याने कुठे तरी पडले हा प्रकार लक्षात येताच शेतकर्याने पोलीस स्टेशनला धाव घेतली आधी माझी पिशवी कोणीतरी खालून कापून त्यातील पैसे चोरी गेल्याचे पोलिसांना सांगीतले याचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांचे मार्गदर्शनाखाली पोनि किसनराव नजनपाटील, हवालदार विश्वास बोरसे, राजू महाजन, किशोर पाटील यांचे पथक नेमून त्यांना शेतकरी आला त्या रस्त्यावरील पोलीस प्रशासनाने बसविलेले तसेच रस्त्यावरील दुकानदारांची सी सी टी व्हि फुटेज तपासून तपास करण्याच्या सूचना केल्यात. यासाठी वरील पथकातील पोलीस कर्मचारी गोल मंदिर ते तहसील कार्यालयापर्यंतच्या रस्त्यावर विचारपूस करीत असतांना ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांकडून अग्रवाल यांचे अभिनंदन होत आहे.