महिलेचा विनयभंग; एकाला पोलीस कोठडी

0
जळगाव-  शहरातील गेंदालाल मिल परिसरातील अठ्ठावीस वर्षीय विवाहीतेला इशारे केल्याचा जाब विचारण्यावरुन वाद होवुन दोघा भामट्यांनी महिलेच्या घरात शिरुन चाकुचा धाक दाखवत विनयभंग केल्याची घटना घडली. पोलिसांनी अटक केलेल्या संशयीतास न्यायालयाने एक दिवस पोलिस रिमांडवर पाठवले आहे.
शहरातील गेंदालालमील भागातील रहिवासी विवाहीता दुकानावर उभी असतांना तीला इशारा केल्याचा जाब विचारला म्हणुन वादाला सुरवात झाली. संशयीतांनी चाकु घेत तीच्या घरात शिरकाव केला, पति समक्ष तीचा विनयभंग करुन पतीला मारहाण केल्या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. शहर पोलिसांनी या प्रकरणी संदीप ऊर्फ डॉन मधुकर निकम (वय-20) व शकंर मधुकर निकम या दोघांना अटक केली आहे. सदिपला आज जिल्हा न्यायलायात न्या. बी.डी.गोरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायलायाने संशयीताला 1 दिवस पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. निखील कुळकर्णी यांनी तर संशयीतातर्फे अ‍ॅड. अजय सिसोदीया यांनी कामकाज पाहिले.