महिलेचा विनयभंग करणाऱ्यास कोठडी

0

चोपडा – शहरातील एका ४० वर्षीय महिलेचा सलग तीन दिवस पाठलाग करून विनयभंग करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अटक करून चोपडा येथील न्यायालयात हजर केले असता त्यास १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून,आरोपीची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. १५ ऑगस्ट रोजी पासून सलग तीन दिवस एक अज्ञात इसम एका ४० वर्षीय महिलेचा विनयभंग करीत होता. मात्र महिलेने अखेर पोलीस स्टेशन गाठून त्या अज्ञात आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली. महिलेच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. चहार्डी येथील सुधीर बाबुराव पाटील (वय- ४८) असे आरोपीचे नाव असून आरोपीस चोपडा येथील न्यायालयात हजर केले असता त्यास १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आज संध्याकाळी आरोपीची जळगाव येथील जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला हवालदार प्रमिला पवार करीत आहेत.