दोन नगरसेवकांसह १५ जणांवर गुन्हा; १४ जणांना अटक
शेंदुर्णी । खाटीक गल्लीत राहणाऱ्या एका २० वर्षीय विवाहितेचा एकाने अंधाराचा फायदा विनयभंग केल्याप्रकरणी दोन गटात दगडफेकसह हाणामारीची घटना गुरूवारी सायंकाळी 6.45 वाजेच्या सुमारास घडली असून परीसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी दोन गटातील आरोपीवर परस्परविरोधात विनयभंग केल्याप्रकरणी दोन नगरसेवकांसह १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील १४ जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच जामनेर, शेंदुर्णी आणि पहूर येथील पोलीसात घटनास्थळी धाव घेतली होती.
अंधाराचा फायदा घेत केला विनयभंग
याबाबत अधिक माहिती अशी की, खाटीक गल्लीत राहणाऱ्या २० वर्षीय विवाहिता शौचालयास सायंकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास जात होत्या. त्यावेळी शेंदुर्णीत विजपुरवठा खंडीत झालेला होता. त्यावेळी परीसरात अंधाराचा फायदा घेत याच परिसरात राहणार पिंटू खाटीक यांने महिलेचा हात धरून अश्लिल चाळे करत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी महिलेन शेंदुर्णी पोलीसात पिंटू खाटीक यांच्या विरोधात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला तसेच पिंटू खाटीक हा स्वत:हून पोलीसाच्या स्वाधीन झाला.
जाब विचारल्याने परस्पर विरोधात गुन्हा
पीडीत महिलेच्या नातेवाईकांनी आरोपी खाटीक यांच्या घरी जावून केलेल्या कृत्याबाबत जाब विचारण्यासाठी आले असता. यावर आरोपीकडील महिलेने पिडीत महिलेच्या नातेवाईकांच्या विरोधात तक्रार दिली असून तक्रारीत म्हटले आहे की, जाब विचारण्यासाठी आलेल्या नातेवाईकांना घरावर चाल करून मारहाण करत अंगावरील कपडे फाडून विनयभंग केला असे नमूद केले आहे.
दोन समाजात तेढ
विनयभंग केल्यामुळे शेंदुर्णीतील दोन समाजात तेढ निर्माण झाली आहे. यावेळी संपुर्ण दहशतीच्या खाली वावरत आहे. दरम्यान ही घटना घडल्याने दोन्ही गटातील घरांवर दगडफेक झाली आहे. यावेळी पोलिस विभागीय अधिकारी प्रशांत बच्छाव यांनी घटनास्थळी धाव घेतली