महिलेची ऑनलाईन फसवणूक ; ओरीसातून आवळल्या आरोपीच्या मुसक्या

भुसावळ/जळगाव : महिलेला केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली दहा हजारांचा गंडा घालणार्‍या आरोपीला जिल्हापेठ पोलिसांनी अक केली आहे. काँग्रेस नारायण कुढेही (26, रा.पंडापदर, ता.रामपूर, जि.कालाहंडी, ओरीसा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. संशयीताला शुक्रवार, 18 मार्च रोजी जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

केवायसीच्या नावाखाली गंडा
जळगाव शहरातील गजानन कॉलनीतील रहिवासी अनुपमा प्रभात चौधरी यांना केवायसी करण्यासंदर्भात अनोळखी इसमाचा फोन आला. संबंधिताने एक लिंक मोबाईलवर पाठवली व ओटीपी क्रमांक मिळून अनुपमा चौधरी यांच्या बँक खात्यातून ऑनलाईन पध्दतीने दहा हजार रुपये काढले होते. याप्रकरणी अनुपमा चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तांत्रिक विश्लेषणाअंती आरोपी जाळ्यात
पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्यासह कर्मचार्‍यांनी तांत्रिक माहितीच्या आधारावर तपास करत संशयीत निष्पन्न केला. हेड कॉन्स्टेबल महेंद्र पाटील, पोलिस नाईक सलीम तडवी, पोलिस कॉन्स्टेबल विकास पहुलकर यांच्या पथकाने ओरीसा राज्यातून संशयीताच्या मुसक्या बांधल्या.