महिलेची 18 हजारांचा ऐवज असलेली पर्स लांबवली

The woman’s purse containing 18 thousand was extended भुसावळ : बसच्या प्रतीक्षेत भुसावळ बसस्थानकावर उभ्या असलेल्या महिलेच्या हातातील पर्स चोरट्यांनी लांबवली. ही घटना रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. पर्समध्ये 17 हजार 500 रुपयांचा ऐवज होता. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

संशयीताचा पोलिसांकडून शोध
तक्रारदार सीमा नंदकिशोर चौधरी (38, राजघाट रोड, बर्‍हाणपूर) या रविवारी दुपारी तीन वाजता बसची प्रतीक्षा करीत असताना चोरट्यांनी त्यांची पर्स लांबवली. त्यात 12 हजार रुपये किंमतीची सोन्याची माळ व पाच हजार पाचशे रुपयांची रोकड असा एकूण 17 हजार 500 रुपयांचा ऐवज होता. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हवालदार नेव्हील जॉर्ज करीत आहेत.