महिलेचे मंगळसूत्र लांबवले

0

कल्याण : डोंबिवली पूर्वेकडील आगरकर रोड परिसरातील प्रशांती सोसायटीमध्ये राहणारी 51 वर्षीय महिला बुधवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास जोशी मार्ग ब्राह्मण सभा हॉल समोरून चालत जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने दुचाकी आली. या दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाने या महिलेच्या गळ्यावर थाप मारत महिलेच्या गळ्यातील 60 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचून पळ काढला. या प्रकरणी पीडित महिलेने डोंबिवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या तक्रारींनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.