जळगाव । कंडारीतील जंगलात कुजलेल्या अवस्थेत शालु प्रकाश गुंजाळ या महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. अखेर महिलेचा खुन करण्यात आले असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर येवून पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली होती. यानंतर आज शनिवारी शेवटच्या सहाव्या संशयितालाही पोलिसांना अटक करण्यात यश आले असून त्यास न्यायालयात हजर केले असता 8 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
चारित्र्याच्या संशयावरून खुन
मन्यारखेडा, जळगाव तालूक्यातील मुळ रहिवासी शालू प्रकाश गुंजाळ (वय-24) या महिलेचा 24 ऑगस्ट रोजी खुन करून तीला कंडारी शिवारातील वनविभागाच्या जंगलात फेकुन देण्यात आले होते. ठिक चार दिवसांनी(ता.28) गुराख्यांना उग्रवास आल्याने त्यांनी शोध घेतल्यावर महिलेचा मृतदेह आढळून आला होता. नशिराबाद पोलिसांत अकस्मीक मृत्युची नोंद करण्यात आली होती.
दरम्यान, पोलिसांच्या तपासाल खून झाल्याचे निषन्न होवून चारित्र्याच्या संशयावरून नातवाईकांनीच खून केल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी लागलीच थेट मन्यारखेडा गाव गाठून रात्रीतच शालूचा भाऊ समाधान प्रकाश गुंजाळ, मावस भाऊ संतोष कैलास ठोंबरे, निवृत्ती नाराण चौथे, रामा कडू चौथ यांच्यासह मन्यारखेडा महिला सरपंचाचे पती लक्ष्मण हरी बाविस्कर या सर्व पाच संशयीतांना अटक करण्यात येवून 8 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. दरम्यान, पोलिस अखेरचा सहावा संशयित आत्माराम धोंडू सोनवणे याचा शोध घेत होते. आज शनिवारी त्यास देखील पोलिसांना अटक करण्यात यश आले आहे. शनिवारी दुपारी त्यास न्यायाधीश नेमाडे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. तर खुन प्रकरणी न्यायालयात कामकाज होवून संशयितास 8 सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अॅड. अनिल गायकवाड यांनी कामकाज पाहिले.