महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले

0
पिंपळेगुरव : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील 65 हजार रुपये किमतीचे गंठण अज्ञात चोरट्याने हिसका मारून पळवले. ही घटना रविवारी (दि. 7) सकाळी सव्वासहाच्या सुमारास पिंपळे गुरव येथील मुस्लिम स्मशान भूमिजवळ घडली. सिंधू विष्णू गायकवाड (वय 63, रा. सुखवानी रेसिडेन्सी, गणेश नगर, दापोडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मॉर्निंग वॉकवेळी प्रकार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंधू गायकवाड रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेल्या. पिंपळे गुरव येथील मुस्लिम स्मशानभूमीसमोर आल्या असता अचानक आलेल्या एका इसमाने त्यांच्या गळ्यातील 65 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण हिसका मारून नेले. त्या चोराच्या मागे पळू लागल्या, परंतु तोपर्यंत चोराने त्यांच्या साथीदारासह काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकल वरून धूम ठोकली. यावरून सिंधू यांनी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.