चाळीसगाव । शहरात रस्त्याने पायी चालणार्या महिलेच्या गळ्यातील 13 ग्रॅम वजनाची 35 हजार रुपये किमतीची सोन्याची पोत मोटारसायकल वरुन आलेल्या दोघा मोटार सायकल स्वाराने लांबविल्याची घटना बुधवारी घडली. शहरातील विवेकानंद नगर भागात ही घटना घडली असून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाप्पा पॉईंट अंध शाळेजवळील रहिवाशी नंदा रमेश चोप्रा विवेकानंद नगर मधील शंकर राजपूत यांच्या घरासमोरुन पायी चालत असतांना पाठीमागून येणार्या मोटार सायकलवरील 2 अज्ञात तरुणांनी सोन्याची पोत लांबविली. महिलेच्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शशिकांत पाटील करीत आहेत.