महिलेच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करीत मारहाण

Beating up a woman in Sakli Village : Crime against one यावल : तालुक्यातील साकळी येथे एकाने पैसे दिल्याच्या कारणावरून महिलेच्या घरात प्रवेश करीत महिलेला शिवीगाळ करून चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी यावल पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

एकाविरोधात गुन्हा दाखल
साकळी, ता.यावल येथील सरला गजानन सोनवणे यांनी यावल पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांनी वासुदेव केशव वडर यांच्याकडून पैसे घेतले होते. वासुदेव वडर हे त्यांच्या घरात जबरदस्तीने शिरून आले व त्यांना शिवीगाळ करून चापटा-बुक्क्यांनी त्यांना मारहाण केली तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादी वरून यावल पोलीस ठाण्यात वासुदेव केशव वडर यांच्याविरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार सिकंदर तडवी करीत आहेत.