महिलेच्या डोक्याला पिस्तुल लावून केसेस मागे घेण्याची धमकी

0
हिंजवडी : माझ्या विरुद्ध केलेल्या सर्व केसेस मागे घे, असे म्हणत एकाने महिलेच्या डोक्याला पिस्तूल लावून धमकावले. ही घटना हिंजवडी येथे घडली. याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शिखर शरद सिंग (वय 30, रा. हिंजवडी. मूळ रा. उत्तर प्रदेश) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या आपल्या मुलासोबत चहा पिण्यासाठी हिंजवडी टाऊनशिप येथे आल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवर एका मुलीसह आलेल्या आरोपीने तू माझ्या विरोधात केलेल्या सर्व केसेस मागे घे, असे म्हणत आरोपीने त्याच्याकडील बॅगेमधून पिस्तुल काढून फिर्यादी महिलेच्या डोक्याला लावली. तुला खल्लास करतो, असे म्हणत महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दुचाकीवरून सोबत असणार्‍या मुलीसह निघून गेला. उपनिरीक्षक गबाले याबाबत अधिक तपास करीत आहेत.