महिलेच्या डोळ्यातून काढली २७ कॉन्टॅक्ट लेन्स

0

ब्रिटीश मेडिकल जर्नलने दिलेल्या माहितीनुसार एका महिलेच्या डोळ्यातून २७ कॉन्टॅक्ट लेन्स काढण्यात आली आहेत. ६७ वर्षाच्या महिलेवर शस्त्रक्रीया करण्यासाठी इंग्लंडच्या सोलिहल हॉस्पिटलमध्ये तिला दाखल करण्यात आले होते.

निळसर मांसात श्लेष्माने लेन्स एकत्र झाली होती. रूपल मोर्जारिया, रीचर्ड क्रोम्बी, अमित पटेल यांनी या बद्दल माहीती दिली. महिलेला कॉन्टॅक्ट लेन्सच्या संख्यबद्दल ऐकून धक्काच बसला. एखाद लेन्स अडकते हे नेहमीच अनुभवास येते परंतु ही घटना आम्ही पहिल्यांदाच पाहिली, मोर्जारिया सांगतात.

३५ वर्षे ही महिला कॉन्टॅक्ट लेन्स वापरते पण पहिल्यांदाच डोळे तपासण्यासाठी डॉक्टरकडे आली. तिला मोती बिंदू होते. शस्त्रक्रीयेसाठी भूल देताना हा प्रकार लक्षात आला.