जळगाव : शहरातील सराफा बाजार ते सुभाष चौकात महिलेच्या पर्समधून 38 हजार 200 किंमतीचे सोन्याचे दागिने व रोकड लांबवण्यात आली. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाळत ठेवून चोरट्याने केली चोरी
वंदना सुभाष ठाकूर (45, साई पॅलेस हॉटेल मागे, वैष्णवी पार्क, जळगाव) या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बुधवार, 9 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास त्या कामाच्या निमित्ताने जळगाव शहरातील सराफा बाजारात आल्या होत्या. काही वस्तू खरेदी केल्यानंतर सराफा बाजाराकडून सुभाष चौकाकडे येत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्समध्ये ठेवलेली सोन्याचे व चांदीचे दागिने आणि दोन हजार रुपयांची रोकड असा 38 हजार 200 किंमतीचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुरुवारी शनीपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल रवींद्र बोदवडे करीत आहे.