महिलेच्या पर्समधून 40 हजाराची रोकड लंपास

0

जळगाव । शहरात महिला चोरट्यांनी गँग अद्यापही सक्रीय असल्याचे मंगळवारी निर्देशनास आले आहे. पाणी भरण्याची विद्युत मोटार खरेदी करण्यासाठी चित्रा टॉकीज चौकात आलेल्या महिलेच्या पर्समधील 40 हजारांची रोकड दोन महिलांनी लंपास केली आहे. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामेश्‍वर कॉलनीत राहणार्‍या शिला चरणदास गुळवे (वय-36) यांचे पती एका कंपनीत नोकरीला आहे. घरासाठी पाण्याची विद्युत मोटार घ्यायची असल्याने दोघे 15 रोजी 40 हजार रूपये घेवून सायंकाळी चित्रा चौकातील चिमनदास ओलीराम या दुकानात आले. 6.30 च्या सुमारास मोटार घेण्यासाठी विष्णुदास ओलीराम या दुकानात जाण्याचे दुकानदाराने सांगितले. त्यामुळे दोघेही त्या दुकानात गेले. मोटार पसंत केल्यानंतर पैसे काढण्यासाठी शिला यांनी पर्स पाहिली असता चैन उघडी दिसली. पर्समधील पैसे तपासले असता आढळून आले नाही.

त्या महिलांनी चोरल्याचा संशय
गुळवे दाम्पत्य मोटार खरेदी करण्यासाठी पहिल्या दुकानात उभे असताना दोन महिला त्यांच्याजवळच उभ्या होत्या. पाहिल्या दुकानातून दुसर्‍या दुकानात जातानाही त्या त्यांच्याच जवळ होत्या. त्यांच्याजवळ एक लहान मुलगाही होता. कोणतीही खरेदी न करता केवळ विचारपूस करीत त्या बाहेर पडल्या. त्यामुळे त्या दोघींनीच पैसे लंपास केल्याचा संशय गुळवे यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस नाईक राजेंद्र परदेशी करीत आहे.