महिलेच्या विनयभंगप्रकरणी आरोपीस शिक्षा

0

जळगाव – आशाबाबा नगर रस्त्याने पायी जाणार्‍या महिलेचा रस्ता अडवून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात दाखल असलेल्या गुन्ह्यात न्यायालयाने संशयित आरोपीला दोषी ठरवून ६ महिन्यांची शिक्षा व १० हजार रुपये ठोठावला आहे. तसेच दंडातील ८ हजार रुपये रक्कम पिडीत महिलेला देण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहे. आशाबाबा नगर रोडने महिला व तिची मुलगी रस्त्याने पायी जात असतांना दि.१६ मे २०१३ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास नाना लक्ष्मण सांगोळे या संशयितांने महिलेचा रस्ता अडवून तिचा विनयभंग केला होता. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या खटल्याचे कामकाज न्या. डी.बी.साठे यांच्या न्यायालयात होवून सरकारपक्षातर्फे पिडीत महिला, तपासधिकारी पोहेकॉ. दिलीप पाटील यांची साक्ष नोंदविण्यात आली. या खटल्याप्रकरणी सरकारी वकील ॲङविद्या राजपुत यांनी प्रभावी युक्तीवाद केला. साक्षी, पुराव्यांवरून न्यायालयाने संशयित आरोपीला भादवी कलम ३५४ खाली दोषी ठरवून ६ महिन्यांची शिक्षा १० हजार रुपये ठोठावला आहे. तसेच दंडातील ८ हजार रुपये पिडीत महिलेस देण्याचे आदेश दिले. तसेच भादवी कलम ३२३ खाली १ महिना शिक्षा व ५०० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. सरकारपक्षातर्फे ॲड. विद्या राजपुत यांनी कामकाज पाहिले.