नवी दिल्ली । विमानात घडणार्या प्रकारामुळे अनेकवेळा सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होतो. परंतु एका विमानात घडलेला अजब प्रकार समोर आला आहे. विमानात हस्तमैथून करणार्या 56 वर्षीय एका प्रवाशाला इंदिरा गांधी विमानतळावर पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी रात्री हैदराबाद ते दिल्ली प्रवासादरम्यान हा प्रकार घडला होता. एका 44 वर्षीय महिला प्रवाशाने या हस्तमैथून करणार्या प्रवाशाविरुध्द पोलिसात तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
प्रवास असुरक्षित
महिला आणि मुलींच्या छेडछाडीचे प्रकार रस्त्यावर, किंवा निर्जन ठिकाणी होताना दिसतातच. बस, किंवा ट्रेनच्या प्रवासादरम्यानही अनेकदा महिलांना छेडछाडीला सामोरे जावे लागते.