महिलेला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी : एकाविरोधात गुन्हा

जळगाव : तालुक्यातील सावखेडा बुद्रूक येथे मागील भांडणाच्या कारणावरून महिलेला काठीने बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी तालुका पोलिसात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

तालुका पोलिसात गुन्हा
जळगाव तालुक्यातील सावखेडा बुद्रुक येथे धनराज भगवान पाटील हे पत्नी देवयानी व मुलगा रुद्र या कुटुंबासह वास्तव्यास आहे. बुधवार, 23 मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास देवयानी हा मुलगा रुद्र याच्यासोबत घराच्या अंगणात बसलेले असताना या ठिकाणी पिंप्राळा येथील रहिवासी फैसल खान असलम खान आला. मागील भांडणाच्या कारणावरून त्यांनी लाकडी काठीने देवयानी यांच्या उजव्या पायावर व तोंडावर डाव्या बाजुला मारहाण केली तसेच शिविगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेत देवयानी या जखमी झाल्या. या प्रकरणी देवयानी यांचे पती धनराज पाटील यांच्या फिर्यादीवरून गुरुवार, 24 मार्च रोजी फैजल खान असलम खान (पिंप्राळा, रा.जळगाव) याच्याविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल सतीश हाळनोर हे करीत आहेत.