महिलेला 30 लाखांत लुटणार्‍या 4 जणांवर गुन्हा दाखल

0

शिरपूर। प्रेमाच्या जाळ्यात अडकवून महिलेला 30 लाखात लुटणार्‍या 4 जणांवर शिरपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिंगावे ता.शिरपूर येथे राहणार्‍या अनिता राजेंद्र पाटील (पावरा) या महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार राजेंद्र प्रेमचंद पाटील रा.गोरगावले ता.चोपडा याने अनिता पाटील हिच्याशी जवळीक साधुन प्रेम संबंध निर्माण केले. गेल्या 10 ते 12 वर्षांपासून त्यांचे प्रेम संबंध आहे.

अनिताबाईंच्या स्वभावाचा गैरफायदा उचलत राजेंद्र पाटील, त्याचा मुलगा प्रितेश राजेंद्र पाटील, माधुरी विनायक चौधरी, नरेंद्र पाटील यांनी तिच्या पगारातील पैसे वापरुन घेतले. तिने पोस्ट ऑफिसमध्ये ठेवलेली दीड लाखांची एफ.डी.ची रक्कम उसनवार घेवून ते परत दिलेच नाही. तसेच तिने घेतलेला प्लॉट विकून 30 लाख रुपये हाडपले. ती तिच्या भावाच्या घरी असतांना तिला शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आरोपींविरुध्द 420, 406, 498 (अ),448, 323, 504, 506 प्रमाणे शिरपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास पीआय वडनेरे करीत आहेत.