सांगवी : महिलेबरोबर ओळख वाढवून जबरदस्तीने बलात्कार केला. तसेच मुलांना मारून टाकण्याची धमकी दिली. हा प्रकार 2014 पासून 11 जानेवारीपर्यंत 2019 पिंपळे गुरव येथे घडला. आरोपीला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. गणेश पांडूरंग निकम (वय 40, रा. पिंपळे गुरव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेबरोबर ओळख वाढविली. तसेच पतीबरोबर घटस्फोट झाल्यानंतर लग्न करण्याचे अमिष दाखविले. शारिरीक संबंध ठेवण्यास विरोध केल्यानंतर आरोपीने शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच तुझ्या मुलांना मारून टाकीन, अशी धमकी दिली. सांगवी ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका सरग तपास करत आहेत.