महिलेवर बलात्कार : आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी

0

मुक्ताईनगर- शहरातील भिलवाडी परीसरातील 25 वर्षीय महिलेवर लग्नाच्या आमिषाने अत्याचार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयीत आरोपी आकाश भागवत बोदडे (मुक्ताईनगर) यास शुक्रवारी अटक करण्यात आली होती. आरोपीस शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. आरोपीने 25 वर्षीय महिलेशी 2013 पासून लग्नाचे आमिष दाखवून शारीरीक संबंध प्रस्थापीत केल्याचा आरोप आहे.