वाकड : परिसरात केटरर्समध्ये काम करणार्या 29 वर्षीय महिलेवर तिच्याच सहकार्याकडून बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याबाबत महिलेने वाकड पोलीस ठाण्यात सहकारी कामगाराविरोधात सोमवारी फिर्याद दिली आहे. रंजन गुप्ता (रा. दुर्वा वसाहत, वाकड) असे आरोपीचे नाव आहे. वाकड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी व पीडित महिला एकाच केटरर्समध्ये मागील पाच वर्षांपासून काम करीत होते. दोघेही विवाहित असून पीडित महिला पतीपासून वेगळी राहत आहे. याचा गैरफायदा घेऊन आरोपीने महिलेच्या घरी जबरदस्तीने जाऊन बलात्कार केला. वाकड पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास वाकड पोलिस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक एस. जी. गोडे करीत आहेत.