रावेत : कारमध्ये विष पिऊन दोघांनी आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास कात्रज बाह्यवळण मार्गावर रावेतजवळ उघडकीस आली. अमोल रविंद्र शितोळे (वय 30, रा. कासारसाई), अनुपमा नवनाथ कारंडे ( वय 41, रा. वाकड) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कात्रज बाह्यवळण मार्गावर रावेतजवळ एका मोटारीत एक महिला व एक पुरुष असे दोन जणांचे मृतदेह आढळुन आले. या दोघांनी विष घेऊन आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.