महिलेस हावभाव करणार्‍या युवकास चोप

0

शहादा । येथील मेमन हाजी इसाक मिल आवारात राहणार्‍या विवाहीत महिलेस अश्लील हावभाव करीत इशारा करीत मोबाईल भेट देऊन संपर्क करण्याचा गळ घालणार्‍या युवकास महिलेच्या नातेवाईकांनी चांगलाच चोप दिला. या प्रकरणी आरोपीविरूध्द रात्री उशिरापर्यंत पोलीसात गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही सुरू होती.

आरोपी मझहर तेली याने या अगोदर दोन तीन वेळेस हावभाव केल्याची माहिती महिलेने वडील व भावास दिली. त्यावेळी दोघा समाजातील जेष्ठ लोकांच्या मध्यस्तीने प्रकार थांबवला. माञ आरोपी तेवढ्यावरच न थांबता त्याने पुन्हा काही दिवसानंतर विकृत चाळे सुरू केले. मझहर तेलीने दुपारी 3-4 वाजे दरम्यान महिला नेहमी प्रमाणे कप़डे टाकण्यासाठी घराच्या मागील भागात आली असता महिलेच्या जवळ जाऊन मोबाईल भेट करीत करून या मोबाइल वरून तु माझाशी संपर्क कर असे म्हणाला. या घटनेमुळे विवाहीत महिला घाबरली. तिने लगेच वडील भावास झालेली घटना सांगितली. यावेळी त्यांनी आरोपीस चांगलाच चोप दिला. महिलेने शहादा पोलीस स्टेशनलादउ तेली विरूद्ध गुन्हा नोंदविला आहे. पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलीमा सातव पुढील तपास करीत आहे.

महिलेस पाहून हावभाव
शहादा ते खेतीया रोड लगत आरोपी मझहर तेली (वय32) रा. शहादा याचे जायका रेस्टारंट नावाची हॉटेल आहे. हॉटेलच्या स्वयंपाक घराचे मागच्या बाजूस खिडकी आहे. हॉटेलच्या मागे रहिवाशी घर आहे. त्या घराची खिडकी व हॉटेल स्वयंपाक रूमची खिडकी समोरासमोर आहे. हॉटेलच्या मागच्या बाजूस फिर्यादी महिला कपडे सुकविण्यासाठी जात असताना आरोपी तेली याने खिडकीतून महिलेस अश्लील हावभाव केले.