चोपडा। तालुक्यातील अकुलखेडा येथे हातातील विळ्याचा धाक दाखवत बळजबरीने शेतात नेऊन बलात्कार करून दागिने काढून घेत महिलेवर अत्याचार करणार्या आरोपीस जिल्हा न्यायालयाने 7 वर्ष शिक्षा व 15 हजार रूपयाचा दंड व कलम 392 प्रमाणे दागिने प्रकरणी 3 वर्ष शिक्षा व 5 हजार रूपये दंड व कलम 354 प्रमाणे 2 वर्ष अशी एकत्र सात वर्षे शिक्षा व 20 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्या.दिनेश कोठलीकर यांनी हा निकाल दिला आहे.
चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पीडित महिला (वय 45) 22 मे 2016 रोजी भावाच्या प्लॉट भागातील घरी गुरांना चारापाणी करीत असल्याचे पाहून आरोपीने हातातील विळ्याच्या धाक दाखवत घरामागे शेतातील पाटचारीच्या बाजूला नेत दारूच्या नशेत वारंवार जबरी बलात्कार केला व अंगावरील सोन्याचांदीचे दागिने काढून घेतले. याबाबत 23 मे 2016 रोजी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत तपासाधिकारी एपीआय सुजित ठाकरे यांनी तपास करून अमळनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. यात एकूण 13 साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडित महिलेवर झालेल्या बलात्कार घटनास्थळाचा पंचनामा, डॉक्टरांचा जबाब, फिर्यादीच्या अंगावरील विकेलेले दागिने प्रकरणी घेणार्या सराफ, यांची साक्ष ग्राह्य धरत 7 वर्ष शिक्षा व 20 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. याबाबत सरकारी वकील राजेंद्र चौधरी यांनी खटल्याचे काम पाहिले. सदर प्रकरणातील चोरलेले दागिने व दंड पीडितास देण्याचे आदेश न्या दिनेश कोठलीकर यांनी दिले आहेत यात पैरवी अधिकारी ए एस आय अशोक पाटील यांनी सहकार्य केले