शहादा। गणेशोत्सव हा सामाजिक संघटनासाठी आहे बैठकीचा माध्यमातून सुसंवाद साधला जातो या वर्षीचा गणेशोत्सव गुलाल मुक्त झाला पाहिजे. गणेशोत्सवाचा माध्यमातून सामाजिक बांधालिकी निर्माण होते असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कल्लशेट्टी यांनी केले. शहरातील लोकमान्य टिळक टॉवुन हॉलमध्ये गणेशोत्सवच्या पार्श्वभूमीवर गणेश भक्तासह शांतता कमेटीचा सदस्याची बैठक आयोजित केली होती यात जिल्हाधिकारी बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र डहाळे उपविभागीय पोलीस अधिकारी एम. बी. पाटील तहसिलदार मनोज खैरनार नगराध्यक्ष मोतीलाल पाटील ज्येष्ठ नेते डॉ. कांतीलाल टाटीया पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत नायब तहसीलदार डॉ. उल्हास देवरे विद्युत वितरण कंपनीचे उपाभियंता मोरे उपस्थित होते. प्रथम जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र डहाळे यांना राष्ट्रपदी पुरस्कार जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी याना आदर्श जिल्हाधिकारीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार कतण्यात आला.
कार्यकर्त्यांनी उत्सव शांततेत पार पाडावा
पोलीस अधिक्षक डहाळे यांनी बोलतांना शांतता ठेवणे सर्वांचे कर्तव्य आहे. समंन्वयाने मार्ग निघतो. सगळ्यांचा सहकार्याने उत्सव पार पडतात असे आवाहन केले. तर डॉ. टाटीया यानी शांतता कमेटीचा बैठकीत केलेल्या सुचनांचे पालन करा. शहर आपले आहे आपल्या सर्वाना सांभाळायचे आहे एकमेकांना समजुन घ्या असे आवाहन केले. नगराध्यक्ष मोतीलाल पाटील म्हणाले प्रशासनाबरोबर उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्व सामान्य कार्यकर्त्यानी सहकार्य करावे. प्रत्येक मनुष्य हा उत्सव प्रिय आहे. उत्सव शांततेने साजरी करण्याची गरज असल्याचे सांगितले.
तरूणांनी शहर सांभळण्यासाठी पुढे यावे
माजी नगराध्यक्ष अशोक बागुल यानी लोकाभिमुख सामाजिक बांधिलकी ठेवणारे जिल्हाधिकारी जिल्ह्यात आले आहे. तरुणांनी शहर सांभाळण्यासाठी पुढे यावे असे सांगितले. या व्यतिरिक्त तहसिलदार मनोज खैरनार, यशवंत चौधरी, शेख जहीर भाई, संजय राजपुत, प्रा. लियाकत सैय्यद, माजी नगरसेवक के. डी .पाटील यानी ही मनोगते व्यक्त केली . प्रास्ताविक पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यानी तर सूत्रसंचालन डॉ. जसराज संचेती यांनी केले. बैठकीस शहादा भाजपा शहर अध्यक्ष जितेंद्र जमदाळे, जयेश देसाईं, मनोज सोनार शेतकरी स्वाभीमानी संघटना जिल्हाध्यक्ष घनश्याम चौधरी, पोलीस पाटील, भगवान पाटील, शांतता कमेटी सदस्य व गणेश भक्त मोठ्याप्रमाणावर उपस्थित होते.
पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करा
पुढे बोलताना जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी यानी शहादा शहरात रहदारीचा प्रश्न गंभीर आहे. पोलीस प्रशासनाने यावर उपाय योजना करावी. गणेशोत्सवात महीलांचा सहभाग वाढवावा. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको. आजचे गुलाल आरोग्याला घातक आहे त्याचा वापर करु नका आजचे गुलाल आरोग्याला घातक आहे त्याचा वापर करु नका शहादा तालुका सामाजिक बांधिलकी ठेवणारा आहे. जिल्ह्यात चांगला बदल शहादा तालुक्यात होतो. कार्यक्रमांना कोणताही विरोध नाही चांगले कार्यक्रम करा शहराचा बाहेर गणपती विसर्जनासाठी जाणार नाही हा प्रयत्न करा पर्यावरण वाचवण्यासाठी गणेशोत्सवातुन करा असे आवाहन केले.