कोलंबो । भारतीय क्रिकेट संघाचा कूल कॅप्टन म्हणून ओळख असलेला महेंद्रसिंग धोनी आता कर्णधारपदावरून पायउतार झालेला असला तरीही त्यांच्या फॅन्सची संख्या वाढती आहे. नुकताच त्याच्या लोकप्रियतेचा अनुभव श्रीलंकेत आला. कोलंबोमध्ये आगामी एकदिवसीय सामन्याची नेट प्रॅक्टिक्स करताना सुरक्षाव्यवस्था भेदून आर. प्रेमदास चक्क सेल्फीसाठी पुढे आला.
प्रेमदासला महेंद्रसिंग धोनीसोबत सेल्फी हवा होता. प्रथम त्याने रोहीत शर्माला धोनी समजून फोटो काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रोहीतने त्याला धोनीकडे पाठवले. महेंद्रसिंग धोनीसोबत सेल्फी काढल्यानंतर या चाहत्यानेदेखील काढता पाय घेतला. प्रेमदास कोलंबोच्या मैदातानच कर्मचारी असल्याने त्याला सरावाच्या ठिकाणी प्रवेश मिळाला. प्रेमदास ऐन प्रॅक्टीसच्या वेळेस आणि सुरक्षा व्यवस्था भेदून आल्यानंतरही धोनीने संयम राखत त्याला सेल्फी दिला. सेल्फीनंतर त्याला तेथून बाहेर पडण्यास सांगितले. त्याप्रमाणे प्रेमदासही धोनीला हस्तांदोलन करून बाहेर पडला.