महेंद्र कदम हे एक वेगळेच व्यक्तिमत्त्व आहे. फार हुशार एखाद्या विषयावर कमी शब्दांमध्ये कमी वेळामध्ये एक चांगला संदेश कसा देता येईल, याचा दांडगा अभ्यास असलेला दिग्दर्शक. माझी आणि महेंद्र कदम यांची खरी ओळख 8/9 वर्षांपूर्वी एका जाहिरातीचं दिग्दर्शन लेखन करताना झाली. माझ्या स्वतःच्या दत्त पब्लिसिटी या कंपनीतर्फे रेडिओ जिंगल्स जाहिराती मी बनवत असे. माझ्याजवळ अगदी गुटखा, आयुर्वेदिक प्रॉडक्ट ते गणपतीचे मोदकाच्या जाहिराती दूरदर्शन व रेडिओसाठी बनवल्या गेल्या आहेत. महाराष्ट्रातील एक नामांकित कंपनी श्रीकृष्ण फार्मसी या कंपनीच्या पाटणकर आयुर्वेदिक काढा ही जाहिरात माझ्या कंपनीतर्फे बनवायची ठरलं. मी विचार करत होतो एका प्रसिद्ध अभिनेत्याने त्यामधील भूमिका करून जी जाहिरात महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचवली आहे त्याच जाहिरातीची मांडणी वेगळ्या कलावंतांना घेऊन करायची आहे.
मोठं आव्हान होतं, पण या सर्व गोष्टींसाठी योग्य लिखाण दिग्दर्शनाची माहिती असलेली व्यक्ती कोण मिळेल याचा विचार चालू असताना मी एका वैयक्तिक अभिनय स्पर्धेसाठी परीक्षक होतो, सोबत महेंद्र कदम हा तरुण परीक्षक म्हणून होता. परीक्षणाच्या मधल्या वेळेत थोडी तोंड ओळख झाली. त्यामध्ये समजलं महेंद्र यांनी काही मालिका जाहिराती बनवल्या आहेत. स्पर्धेचा निकाल दोघांच्या योग्य अशा निवडीमुळे कोणतीच वादातीत चर्चा न होता जाहीर झाला. मी सहज महिंद्र यांना म्हणालो, माझ्याकडे कुठली जाहिरात करण्याचं काम आलं तर नक्कीच तुम्हाला बोलवेन आणि पाटणकरांच्या या जाहिरातीच्या वेळी डोळ्यासमोर महेंद्र कदम हे नाव आलं आणि जाहिरातीचा लिखाणापासून ते दिग्दर्शनापर्यंत महेंद्र यांनी पाटणकर काढा ही जाहिरात विजय पाटकर या अभिनेत्याला घेऊन एवढी सुंदर बनवली. त्याचं कौतुक स्वतः विलास पाटणकर काढाचे मालक यांनी केलं. महेंद्र कदम यांनी मराठी व्यावसायिक रंगभूमीवर गुण्यागोविंदाने हे नाटक दिग्दर्शित केलं होतं. होममिनिस्टर या मालिकेनंतर आंबट गोड, ग साजणी, हास्य सम्राट या मालिकेला प्रेक्षकांनी पसंती दिली. सध्या महेंद्र कदम हे चित्रपट कथा संवाद लिहिण्यांमध्ये व्यस्त आहेत. त्यांच्या पुढील उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा!
‘होममिनिस्टर’ला मूर्तस्वरूप
होममिनिस्टर म्हणजे झी टीव्ही व आदेश बांदेकर हीच नावं डोळ्यासमोर येतात, पण कोणतीही कलाकृती मालिका कार्यक्रम प्रेक्षकांना पसंत पाडण्यासाठी त्या कार्यक्रमाच्या यशासाठी झटणारे पडद्यामागील कलाकार कोण हे प्रेक्षकांना माहीत नसतं, होममिनिस्टर या कार्यक्रमांची बांधणी स्क्रिप्ट दिग्दर्शन करणार. एक नाव म्हणजे कल्पक अभ्यासू मेहनती लेखक -दिग्दर्शक महेंद्र कदम.
-गुरुदत्त लाड
सरव्यवस्थापक,जनशक्ति, मुंबई
9820003955