महेलखेडीच्या मजुराचा विहिरीत तोल जावून पडल्याने मृत्यू

0

यावल- तालुक्यातील महेलखेडी येथील मजूर शेतातील कोरड्या विहिरीत बांधकाम करीत असताना पालक सरकल्याने तोल जावून पडल्याने 52 वर्षीय मजुराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी 11 वाजता कोळवद शिवारात घडली. सलीम बलदार तडवी (52, महेलखेडी, ता.यावल) अये मयत मजुराचे नाव आहे. कोळवद शिवारातील निवृत्ती गोपाळ भिरूड यांच्या शेतातील विहिरीचे बांधकाम मजूर तडवी करीत होते मात्र अचानक बांधकामाचा पालक सरकल्याने तोल जावून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी यावल पोलिसात मयताचा भाऊ जहांगीर बलदार तडवी यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सिकंदर तडवी करीत आहेत.