महेशनगरात घरफोडी; दागिन्यांसह रोकड लंपास

0

भुसावळ । शहरातील महेश नगरात घरात कुणीही नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करुन दागिणे व रोख रक्कमेसह 1 लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना शनिवार 9 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. महेश नगरातील एन.आर. पाटील हे चार ते पाच दिवसापासून आपल्या परिवारासह पुणे येथे वैद्यकिय कामासाठी घेऊन गेले आहेत. मात्र घराची देखभाल करण्यासाठी विश्‍वासातील व्यक्ती याठिकाणी रात्री झोपण्यासाठी येत असे हि व्यक्ती रात्री झोपण्यासाठी आला असता चोरी झाली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

घरमालक नसल्यामुळे गुन्ह्याची नोंद होईना
या घरात झोपण्यासाठी येणार्‍या भिका पाटील नामक व्यक्तीने गॅलरीच्या दरवाज्याचे कुलूप उघडले. त्यानंतर घराचा मुख्य दरवाजाचे कुलूप उघडले. त्यामागील लोखंडाचा दरवाजा घडण्याचा प्रयत्न करीत असताना तो दरवाजा उघडत नसल्यामुळे भिकाने पळ काढून मावशी, पत्नी, मुलगा यांना घरून सोबत आणले व किचनमधील खडकीतून घरात डोकावून पाहिले असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसल्यामुळे त्यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशनला झालेल्या घटनेची माहिती दिली. काही वेळानंतर पोलीसांनी घटनास्थळी पोहचून पाहणी केली. मात्र घरमालक पुण्याला असल्यामुळे गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.