जळगाव । माहेश्वरी समाज आणि जळगाव मनपाच्या सहयोगाने रिंग रोडवरील महेश चौक व महेश मार्ग नामकरण तसेच गुरूवार 1 जून रोजी संध्याकाळी 5.30 वाजता महेश चौकाजवळील मणियार मैदानामध्ये आयोजित लोकार्पण सोहळा उत्साहात समाज बांधव व मान्यवरांच्या उपस्थित उत्साहात पार पडला. यावेळी ढोल ताशाच्या गजरात माहेश्वरी समाज मंडळाच्यावतीने भगवान महेश यांचे पूजन करण्यात आले. प्रमुख मान्यवर म्हणून भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू तर प्रमुख अतिथी म्हणून अ.भा. माहेश्वरी महासभेचे सभापती शाम सोनी यांची प्रमुख उपस्थिती होते. तसेच सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील,आमदार स्मिता वाघ, मनपा आयुक्त जीवन सोनवणे, महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे आणि सभागृहनेते रमेश जैन,नगसेवक सुचिता हाडा,रोहन बाहेती,नगसेवक अमर जैन ,नगरसेवक जितेंद्र मुंदडायांच्या सह समाजातील मान्यवरांचीही यावेळी उपस्थिती होती.
मनपाचा सुशोभिकरण उपक्रम : जळगाव मनपाच्या शहर सुशोभिकरण उपक्रमात माहेश्वरी समाजानेही योगदान दिले असून त्याअंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या लोकार्पण समारंभाला जनतेने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याने कार्यक्रमात उत्साह संचारला होता. जळगाव जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष मनिष झवर , सचिव तेजस देपुरा, जळगाव शहर आणि तालुका माहेश्वरी सभेचे अध्यक्ष राधेशाम बजाज व सचिव तुषार तोतला यांच्या अथक परिश्रमाने मनपाला सोबत घेऊन अवघ्या काही दिवसात चौक सुशोभिकरण करण्याचे कार्य हाती घेण्यात आले होते.