कुदळवाडी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शाळा क्र. 89 कुदळवाडी शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वितरण करताना नगरसेविका महेश लांडगे युवा मंचचे अध्यक्ष व स्विकृत सदस्य दिनेश यादव, संतोष जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मुरलीधर ठाकूर, रोहित जगताप, शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक उपस्थित होते. अश्विनी जाधव म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी नियमित उपस्थित राहून अभ्यास केला पाहिजे. आई-वडिलांचे नाव उज्वल करावे. तसेच विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करून शाळेचे नाव मोठे करावे व क्रीडास्पर्धेतही आपले कौशल्य दाखवावे अशा भावना स्विकृत सदस्य दिनेश यादव यांनी मनोगतात व्यक्त केल्या.