माँ पद्मावती सन्मान मोर्चाला सुरूवात

0

जळगाव । माँ पद्मावती सन्मान मोर्चा नुतन मराठा महाविद्यालयापासून सुरूवात करण्यात आली. या मोर्चात जिल्ह्यातील समाजबांधव यात सहभागी झाले आहे. माँ पद्मावती सन्मान मोर्चा जिल्हा कृति समितीतर्फे या मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी ‘माँ पद्मावती के सन्मान मे, सारे क्षत्रिय मैदान मे‘ हे सदर मोर्चाचे ब्रीदवाक्य असून, माँ पद्मावती यांच्या सन्मानासाठी मोठ्या संख्येने जिल्ह्यातील बांधव यात सहभागी झाले आहे. आज योगायोगाने क्रांतीसूर्य महाराणा प्रताप यांचा स्मृतिदिनही आहे. जिल्ह्यातून येणार्‍या वाहनांसाठी खानदेश सेंट्रल मॉल जवळील मैदानावर पार्किंगची नियोजन व्यवस्था करण्यात आली आहे. आज सकाळी दाखल झालेल्या समाज बांधवामध्ये महिला, मुली, ज्येष्ठ नागरीक व समाज बांधवांनी सहभाग झाले आहे.