जळगाव। मांगलील बाफना नेत्रपेढी चिकित्सालयाचे विद्यमाने नेत्रदान पंधरवड्यानिमित्त संकल्प शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. केशवस्मृती प्रतिष्ठान व आर.सी.बाफना फाउंडेशन ट्रस्ट संचलित ‘मांगीलालजी बाफणा नेत्रपेढी’ ही गत 18 वर्षापासून नेत्रदान स्वीकारणारी व मोफत नेत्रदान करणारी उत्तर महाराष्ट्रातील नामांकित सेवाभावी संस्था आपणा सर्वांना चिरपरिचित आहे. आतापर्यंत 404 व्यक्तीच्या नेत्रदानातून 195 व्यक्तींना दृष्टी लाभली आहे.
शासनातर्फे दि. 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2017 पासून राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्ताने नेत्रदान चळवळ व्यापक व्हावी ह्या सामाजिक हेतूने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 28 सोमवार रोजी सकाळी 9.30 ते 11.30 या वेळात नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे जळगाव शहर व जिल्ह्यातील सर्व सरकारी, निमसरकारी, महापालिका ई.मधील अधिकारी व कर्मचारी यांचे करिता नेत्रदान संकल्प शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.