मांगीलाल नेत्रपेढीतर्फे नेत्रदान प्रशिक्षण

0

जळगाव । शहरातील केशवस्मृती प्रतिष्ठान ही सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेली संस्था असून माधवराव गोळवलकर रक्तपेढी, मांगीलालजी बाफना नेत्रपेढी व चिकित्सालय माातोश्री वृद्धाश्रम, क्षुधाशांती केंद्र समतोल प्रकल्प, आश्रय फाऊंडेशन सेवावस्ती, विभाग माधव बहुउदेशीय प्रतिष्ठान, विवेकानंद प्रतिष्ठान यासारख्या सहयोगी संस्थाच्या माध्यामातून सेवा देण्याचा प्रयत्न केशवस्मृती करत आहे. मांगीलालजी बाफना नेत्रपेढी व चिकित्सालयात ही प्रामुख्याने नेत्रदान चळवळीशी जोडलेली संस्था आहे.

इच्छूक रुग्णांना उपस्थितीचे आवाहन
यासंस्थांद्वारे 403 व्यक्तीकडुन नेत्रदान स्वीकारुन 195 व्यक्तीना माफत नेत्रपटलरोपण शस्त्रक्रिया करुन दृष्टीप्राप्त झालेली आहे. 2016 -17च्या एकाच वर्षात 30 व्यक्तीनी दृष्टी प्राप्त केली. अंधत्व असलेल्या व्यक्तीना नेत्रदानामूळे द्रुष्टी लाभते त्यांच्या जीवनात आनंद होतो. जैन समाजामाणे बहुजन समाजाचा नेत्रदानानील सहभाग वाढवा. यासाठी मांगलालजली बाफना नेत्रपेढी व चिकित्सालयामार्फत उपक्रम करण्यात आले आहे. किर्तनकाराचा किर्तन व प्रवचनद्वारे विविध सामाजिक प्रश्‍नाबाबत जनजागृती करतात, किर्तनकार बंधुभगीनी नेत्रदान चळवळीची तपशीलवार माहिती देण्यासाठी सहविचाराचे आयोजन करण्यात आले आहे. 25 सप्टेंबर 2017 सोमवारी हा कार्यक्रम आहे. तरी किर्तनकार यांनी सहविचार सभेत उपस्थित राहण्याचे आवाहन नेत्रपेढीतर्फे करण्यात आले.