मांजरी विद्यालयात विद्यार्थी, पालक मेळावा उत्साहात

0

पिपळनेर । साक्री तालुक्यातील मांजरी येथील इंदिरा माध्यमिक मुलींची शाळा येथे शिक्षक पालक मेळावा संपन्न झाला. अध्यक्षस्थानी यमुनाबाई राऊत होत्या. या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थीनींना व पालकांना मार्गदर्शन करण्यात आले.

यापालक मेळाव्याचे औचित्य साधून पावसाळी जिल्हास्तयरीय क्रीड़ा स्पर्धेत खो-खो खेळात जिल्हास्तरावर उपविजेतेपद मिळवणार्‍या मुलींचा सत्कार मुख्याध्यापिका सोनाली राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद घरटे यांनी केले.