मांजामध्ये अडकलेल्या घारीची सुटका

0

निगडी : यमुनागर येथे पंतगाच्या मांजामध्ये अडकलेल्या घारीला पक्षीमित्राने जीवनदान दिले. घारीवर उपचार करुन तिला हवेत सोडून देण्यात आले आहे.निफाडकर यांच्या घराजवळ पंतगाच्या मांजामध्ये रविवारी एक घार अडकून पडली होती.

तेथून जाणारे निगडीतील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे कार्यकर्ते विकास देशपांडे यांनी तातडीने संपर्क करुन संभाजीनगर येथील पक्षीमित्र अभिजित पवार यांना याबाबत माहिती दिली. पवार यांनी त्वरीत हालचाल करून या घारीला अलगत ताब्यात घेऊन हळुवारपणे मांजा काढून मोकळे केले. सुदैवाने फार मोठ्या जखमा झालेल्या नसल्याने प्राथमिक उपचार करून पुन्हा आकाशात सोडून दिले.