अमळनेर । महाराष्ट्र पत्रकार संघ रत्नागिरी यांच्या मार्फत देण्यात येणारा सन 2017 चा समाजभूषण पुरस्कार शिर्डी येथे महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते पंचायत समिती साक्री येथे कार्यरत असलेले विस्तार अधिकारी व अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील रहिवासी असलेले बी.एन.पाटील यांना देण्यात आला. शासनाच्या वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तींपर्यंत आत्मयीतेने पोहचण्याचा प्रयत्न करतात दलीतवस्त्या सुधार,रस्ते,पाणी,इंदिरा, आवास,दारिद्री निर्मूलन व शासनाच्या विविध कार्य ते समाजासाठी करीत असतात त्यांच्या या कार्याची दखल घेत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई,शिर्डी संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम साईबाबा संस्थाचे कार्यकारी अधिकारी तथा खासदार वाकचोर, पत्रकार संघाचे राज्यध्यक्ष विलास कोळेकर यांच्याहस्ते बी.एन. पाटील यांना सपत्नीक सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यांनी केले अभिनंदन: त्यांच्या या यशाबद्दल अरुणभाई गुजराथी, वसंतराव मोरे, ललिता पाटील, अनिल भाईदास पाटील, डॉ.बी.एस. पाटील, तिलोत्तमा पाटील, विनोद भैय्या, आमदार शिरीष चौधरी, आमदार कदम बांडे, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे. महाराष्ट्र राज्य विस्तार अधिकारी संघटना समाज कल्याण व आय.आर.डी.पी. या संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून संघटनेचे काम करीत आहेत.