मांडळ गटातील एकलहरे विकासोवर भाजपाचा झेंडा

0

अमळनेर। तालुक्यातील मांडळ गटातील एकलहरे येथील विविध कार्यकारी सोसायटीवर भाजपाचे वर्चस्व झाले आहे. या निवडणुकीकडे संपुर्ण मुडी-मांडळ गटाचे लक्ष लागून होते. भाजयुमो तालुका सरचिटणीस दिलीप पाटील यांनी 12 सदस्यांपैकी 7 सदस्य बिनविरोध निवडून आणून एक हाती सत्ता पहिल्यांदाच मिळविली आहे. चेअरमनपदी नागो माळी, व्हा.चेअरमनपदी आशाबाई पाटील तर सदस्यपदी पांडुरंग वाघ, अनिल पाटील, अधिकार पाटील, संतोष कोळी, भाईदास पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

कार्यकारिणीतील सदस्यांचे केले अभिनंदन
नवनियुक्त झालेले चेअरमन, व्हा. चेअरमन व सदस्यांचे आमदार स्मिताताई वाघ, भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ, माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष व पं.स. सदस्य भिकेश पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, जि.प.सदस्य संगीता भिल, पं.स. सभापती वजाबाई भिल, उपसभापती त्रिवेणीबाई पाटील, कृउबा समिती संचालक पावभा पाटील, माजी जि.प. सदस्य संदीप पाटील, पं.स.माजी सभापती शाम अहिरे, डॉ.दिपक पाटील, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, मुडी मांडळ गटप्रमुख साहेबराव पाटील यांनी सदस्यांचे अभिनंदन केले.