मांडवेदिगरच्या आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

0

भुसावळ : संपूर्ण जगासह भारतात कोरोना विषाणूने थैमान घातले असून या विषाणूचा झपाट्याने वाढणारा प्रादुर्भाव रोखण्याकरीता सर्वत्र लॉकडाउन सुरु आहे. यामुळे गोरगरीब मजूरव हातावर पोट भरणार्‍या नागरीकांचे मोठे हाल होत आहेत. अशा परीस्थितीत ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांना दिलासा देण्यासाठी भुसावळातील सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेने मदतीचा हात पुढे केला आहे. मांडवेदिगर येथील गोरगरीब गरजुंना जीवनावश्यक वस्तुंचे नुकतेच वाटप करण्यात आले.

जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप
सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्था भुसावळतर्फे जीवनावश्यक वस्तु म्हणून पीठ, तांदूळ, साखर, तेल, डाळ आदीं वस्तुंचे वाटप बुधवार, 20 में रोजी तालुक्यातील मांडवेदिगर आदिवासी पाडा येथे करण्यात आले. शेकडो कुटुंबाना संस्थेतर्फे मदत करण्यात आली. या मदत कार्यात गेंदाबाई मोहनलाल लोढा, मोहन भुवन प्रतिष्ठान जामनेर अध्यक्ष विनोद कुमार लोढा यांनी किट उपलब्धतेकरीता विशेष सहकार्य लाभले. संस्थाध्यक्षा राजश्री नेवे, अध्यक्ष विनोद कुमार लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी सोशल डिस्टन्सींगचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.

यांनी घेतले परीश्रम
जीवनावश्यक वस्तू वाटपाकरीता संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नेवे, माया चौधरी, मंदाकिनी केदारे, स्मिता माहुरकर, संगीता लुल्ला तसेच उमेश नेवे, शिवाजी पाटील, दीपक महाजन, सारंग केदारे, गोरलाल जाधव यांच्यासह संस्थेच्या सदस्यांचे सहकार्य लाभले.